के.के.वाघ शिक्षण संकुलात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

2025-07-25

भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील के.के.वाघ शिक्षण संकुलात भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मा.शकुंतलाताई वाघ यांच्या शुभहस्ते आजचे ध्वजारोहण करण्यात आले.गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्याप्रसंगी के.के.वाघ विद्याभवनचे प्राचार्य श्री.अशोक बस्ते सर, गुरुकुलचे प्रमुख श्री.श्रीकांत ढवळे, कॅम्पस समन्वयक श्री.यशवंत ढगे,सी.बी.एस.सी.स्कुलचे प्राचार्य श्री.बाळासाहेब मोंढे, कन्या छात्रालयाच्या प्रमुख सौ. बोरस्ते मॅडम यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसह स्काऊट गाईड पथक, हरित सेना पथक यांनी उत्कृष्ट संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. दहावी मार्च २०२४ परिक्षेतील प्रथम पाच यशस्वी विद्यार्थीनींना गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या दिवंगत उपशिक्षिका सौ.सुलभा कासार यांच्या स्मरणार्थ सन्मानित करण्यात आले.सौ.शैलजा घोटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सौ.सुनिता वडघुले यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्री.वसंत खैरनार यांनी मानले. क्रीडा शिक्षक श्री.धनंजय मोरे, श्री.गोविंद कांदळकर, श्री.समीर शेख व श्री.सागर डोखळे यांनी संचलन तयारी करून घेतली व के.के.वाघ कॅम्पस भाऊसाहेब नगरचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.