गीताई कन्या विद्यालयात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत-

2025-03-25


कसबे सुकेणे ता भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात नवीन वर्ष २०२५ चे स्वागत जल्लोषात करण्यात आले.नवीन वर्षात पदार्पण करताना सर्वांनी नवीन विश्वास व नव्या संकल्पासह वाटचाल करत आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे.असे अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांनी सांगितले यशवंत ढगे,बस्तीराम रानडे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कु ईश्वरी वाघमारे हिने सूत्रसंचालन, प्रास्ताविक स्नेहल हांडगे,तर कु प्रेरणा साबळे हिने आभार मानले सौ.संगीता ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
(फोटो -गीताई कन्या विद्यालय भाऊसाहेब नगर ता निफाड विद्यालयात नववर्षाचे केक कापून जल्लोषात स्वागत करताना मुख्याध्यापिका उज्वला तासकर व आदी)