2025-03-25
भाऊसाहेब नगर ता.निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सहविचार सभेसाठी के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मा.शकुंतलाताई वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक व सह शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना व्हावी यासाठी पालकांनी अशा उपक्रमांसाठी नेहमी शाळेच्या संपर्कात राहून संवादातून समस्या सुटेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,असे आवाहन मुख्याध्यापिका सौ.तासकर यांनी केले.सहविचार सभेचे सूत्रसंचालन सौ.शैलजा घोटकर यांनी केले.विद्यार्थीनी घरी आल्यावर पालकांनी मित्र बनुन त्यांच्या समस्यांकडे पाहण्याची गरज श्री. वसंत खैरनार यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.याप्रसंगी के.के.वाघ विद्या भवनाचे प्राचार्य श्री.अशोक बस्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव नाठे, समन्वयक श्री.यशवंत ढगे यांनी पालकांना मार्गदर्शन करुन पालकांच्या समस्यांचे निराकरण केले. युनिव्हर्सल स्कूलचे प्राचार्य श्री.बाळासाहेब मोंढे,कन्या वस्तीगृहाच्या प्रमुख उषा बोरस्ते या मान्यवरांसह महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यवेक्षिका सौ.सुनिता वडघुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सौ.संगिता ननवरे यांनी आभार प्रदर्शन केले.सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.