2025-03-25
कसबे सुकेणे ता 28- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात डॉ.सी.व्ही.रामन यांनी शोधलेल्या रामन इफेक्ट निमित्त देशभरात साजरा होणारा विज्ञान दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.ईश्वरी वाघमारे व कोमल झाल्टे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पौर्णिमा जगताप हिने प्रास्ताविक केले.गायत्री राऊत, समृद्धी बोडके,कोयल बोरसे,आरुषी धुमाळ, जान्हवी ढगे, श्रद्धा जाधव, तृप्ती वाघेरे, समृद्धी पाटील, ईश्वरी जोंधळे या विद्यार्थीनींनी सी.व्ही रामन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.विज्ञान रांगोळी स्पर्धेत अनेक विद्यार्थीनींनी स्वत:ची कल्पकता वापरून रांगोळी प्रदर्शन मांडण्यात आले.सौ.शैलजा घोटकर व सौ. सुरेखा गोराडे यांनी रामन इफेक्टची माहिती सांगुन जगासाठी हा मौलिक शोध असल्याचे सांगितले.विज्ञान हे योग्य प्रकारे उपयोग केला तर सर्व जगासाठी वरदान असुन विद्यार्थीनींनी वैज्ञानिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन मुख्याध्यापिका सौ तासकर यांनी केले.अनुष्का झाल्टे हिने आभार मानले.सर्व विद्यार्थीनी, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.