2025-03-25
भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात गाईड विभागाचा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली हा आनंद मेळावा संपन्न झाला.विद्यार्थी दशेत विद्यार्थीनींना खरी कमाई चे महत्व समजावे हा या आनंद मेळावा घेण्याचा खरा उद्देश यामाध्यमातून साध्य होत असतो.वेगवगळ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावुन विद्यार्थीनींनी खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.के.के.वाघ विद्याभवनचे प्राचार्य श्री.अशोक बस्ते या आनंद मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूलचे प्राचार्य श्री.बाळासाहेब मोंढे,बस्तीराम रानडे, गणेश टर्ले, विद्याभवनचे स्काऊट विभाग प्रमुख श्री.मनोज तुसे, कन्या वस्तीगृहाच्या प्रमुख उषा बोरस्ते मॅडम,आर.डी.गांगुर्डे, श्री.संजय धनगर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सौ.सुनिता वडघुले यांनी आनंद मेळाव्याचे प्रास्ताविक केले, शैलजा घोटकर यांनी सूत्रसंचालन केले तर गाईड विभाग प्रमुख सौ सुरेखा गोराडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.