2025-03-25
कसबे सुकेणे ता ७- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी मनोहर बडगुजर होते. प्रथम डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनींनी संविधान प्रास्ताविका वाचन केले. सिद्धी बोरस्ते,काजल जाधव, संजना थोरात,तन्वी शेजवळ, गुंजन दिवेकर, ऋतुजा देशमुख, ज्ञानेश्वरी आहेर, सानिया शेख व गौरी वक्ते या विद्यार्थ्यीनींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.शिक्षिका सौ.शोभा सोनवणे, सौ.संगीता ननवरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर बडगुजर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकल.प्रास्ताविक कोमल घोलप हिने तर स्वरा मोरे हिने सूत्रसंचालन तर आभार आर्या शिंदे हिने मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.