2025-03-25
भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त या महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले.व अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी आपल्या भाषणातुन महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आपले विचार व्यक्त केले.यावेळी १ ऑक्टोबर पासून ते ७ ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताह अंतर्गत वन अधीक्षक श्री नवनाथ गांगोडे व वनरक्षक कल्पना पाईकराव यांनी वन्यजीव संरक्षण व संवर्धन याबाबत विद्यार्थ्यीनींना मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन स्वच्छता जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले.त्याचबरोबर मतदार जनजागृती अभियान अंतर्गत फेरी काढण्यात आली.प्रत्येक विद्यार्थीनीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा जीवनात अवलंब केला तर आपल्या हातुन नक्कीच चांगले काम होईल म्हणून प्रत्येकाने या महान व्यक्तींनी सांगितलेल्या मार्गाने चालायचे आवाहन अध्यक्षीय भाषणात मा.सौ.उज्वला तासकर यांनी केले.सौ.सुनीता वडघुले व श्री.देविदास सोनवणे यांनी गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या विचारांची कास धरली पाहिजे असे यावेळी सांगितले.सिद्धी ताजणे, गुंजन दिवेकर, गायत्री शेळके, जान्हवी आहेर, प्रांजल मोरे व कोमल जाधव या विद्यार्थ्यीनींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.गायत्री जाधव व अनुष्का लोणारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,समीन शेख हिने प्रास्ताविक केले तर सायली जाधव हिने आभार प्रदर्शन केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.