गीताई वाघ कन्या विद्यालयात शिक्षक दिन साजरा

2025-03-25

भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात शिक्षक दिन व श्री.चक्रधर स्वामी जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतलाताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर होत्या.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता,सर्वपल्ली राधाकृष्णन् व महानुभाव पंथाचे संस्थापक श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.दहावीच्या वर्गातील विद्यार्थीनींनी अध्यापन केले व सर्व विद्यार्थीनींचे शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रण ठेऊन उत्कृष्ट पद्धतीने व्यवस्थापन केले.मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थीनी कु.समृद्धी पाटील हिने काम केले.सर्व विद्यार्थीनींनी शिक्षणाबरोबरच आपल्या शारीरिक व मानसिक विकासावर लक्ष देउन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थीनींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करून आपल्या शिक्षकांचा आदर्श वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.सर्व शिक्षकांचा सन्मान करुन विद्यार्थीनींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.चैताली मोगरे,प्राची लोखंडे, लावण्या गायकवाड, पूर्वा जाधव, गायत्री शेळके यांनी मनोगत व्यक्त केले स्वानंदी निकम व श्रृती डेर्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व माधुरी पगारे हिने सर्वांचे आभार मानले.