2025-03-25
भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा दिंडोरीचे खासदार मा.भास्कर भगरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मा.खासदार भास्कर भगरे व के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मा.शकुंतलाताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीने दिमाखात पार पडलेल्या या कार्यक्रमाला के.के.वाघ विद्याभवनचे प्राचार्य श्री.यशवंत ढगे, उपप्राचार्य श्री.दिवाकर शेजवळ,सी.बी.एस.सी.चे प्राचार्य श्री.बाळासाहेब मोंढे, पर्यवेक्षिका सौ.सुनीता वडघुले, गुरुकुलच्या सौ.उषा बोरस्ते यांची उपस्थिती होती.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.वर्षभर राबवलेल्या वक्तृत्व स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धेत विभागीय विजेतेपदासह विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरीय प्रथम बक्षीस,स्नेहसंमेलनात विविध कलागुण स्पर्धा, चित्रकला परिक्षेत यश मिळवलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थीनींचा यावेळी पदकं देऊन सन्मान करण्यात आला.विद्यार्थीनींनी आपल्या विविध सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणा-या अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन श्री.भगरे यांनी केले. सौ.शैलजा घोटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सौ.सुनिता वडघुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री.वसंत खैरनार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.सर्व विद्यार्थीनी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.