2025-03-25
कसबे सुकेणे ता 20 भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यीनींना बोर्ड परीक्षेसाठी आशिर्वादरुपी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सदिच्छा निरोप समारंभाला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका मा.कुंदा बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी गौरी वक्ते,मयुरी कळसे, धनश्री गायकवाड,लावण्या गायकवाड व प्राची लोखंडे या विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले जीवनात यश संपादन करण्यासाठी अभ्यास हाच सर्वोत्तम मार्ग असुन सर्वांनी उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी झपाटुन जाऊन यश प्राप्त होईपर्यंत अविरत अभ्यास केला पाहिजे.आणि सर्व गुणी विद्यार्थीनी भावी आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील अशी अपेक्षा मा.बच्छाव यांनी व्यक्त केली.मुख्याध्यापिका सौ तासकर शैलजा घोटकर व वसंत खैरनार यांनीही मार्गदर्शन करत सर्व गीताई परीवाराच्या वतीने विद्यार्थीनींना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विद्या भवनाचे प्राचार्य यशवंत ढगे, उषा बोरस्ते, पर्यवेक्षिका सौ.सुनीता वडघुले यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.