2025-03-25
कसबे सुकेणे ता 20- गीताई वाघ कन्या विद्यालय भाऊसाहेब नगर ता निफाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापिका सौ.उज्ज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवरायांच्या आरतीने शिवप्रतिमा पूजन व कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रिती देशमुख हिने प्रास्ताविक केले.उपासना धोत्रे व स्वरा मोरे या विद्यार्थ्यांनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.वेदिका देशमुख,मालती कुमावत,कोमल घोलप, श्रृती ढगे, गायत्री शेळके,पूर्वा जाधव, समृद्धी चव्हाण, ईश्वरी शिंदे या विद्यार्थीनींनी व पर्यवेक्षिका सौ.सुनीता वडघुले यांनी शिवरायांचे चरित्र समजुन घेण्याची आवश्यकता असल्याचे आपल्या मनोगतात प्रतिपादन केले.तन्वी श्रावण हिने आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमासाठी विद्यार्थीनी, सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.