2025-03-25
कसबे सुकेणे ता २७- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका सौ उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संविधान दिवस साजरा करुन मुंबई वरील आतंकवाद्यांनी केलेल्या (२६/११) अतिरेकी हल्ल्यातील शुर शहीदांना अभिवादन करण्यात आले.संविधान हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे सांगून स्वरा मोरे व ईश्वरी वाघमारे या विद्यार्थीनींनी आपल्या मनोगतात संविधानाप्रती अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले देविदास सोनवणे व अंकिता काळे यांनी मुंबईवरील आतंकवाद्यांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या जीवाची बाजी लावून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी बलिदान केल्याचे सांगितले भारतीय संविधान हे फक्त एक पुस्तक नसुन प्रत्येक भारतीय नागरिकाला लाभलेला तो एक अमूल्य ठेवा असल्याचे मुख्याध्यापिका सौ.तासकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.