गीताई वाघ कन्या विद्यालयात बालदिन-

2025-03-25


कसबे सुकेणे ता १४- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका सौ उज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.भारताचे पहिले पंतप्रधान असताना देशाच्या उभारणीत नेहरुंचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन यावेळी सौ.तासकर यांनी केले.काजल जाधव हिने सूत्रसंचालन ,समता कोरडे हिने प्रास्ताविक तर समिक्षा नन्ने,वेदिका मत्सागर, वेदिका देशमुख,काजल जाधव, काजल झाल्टे, तनुजा गोडसे, तनुजा मोगरे,गौरी वक्ते व शिक्षिका सौ.सुनिता वडघुले यांनी पंडित नेहरू व बाल दिना विषयी माहिती दिली.दिशा कराटे हिने आभार व्यक्त केले.