गीताई वाघ कन्या विद्यालयात स्वीप अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन 

2025-03-25


भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जनजागृती अभियानांतर्गत मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मतदार जागृती करण्यात येत आहे.
स्वीप अंतर्गत... 
मतदान कर... निफाडकर
 या उपक्रमांतर्गत विद्यार्थीनीच्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन, मानवी साखळी, प्रत्येक पालकास संकल्प पत्राचे वाटप व वाचन व गावातुन मतदार जनजागृती रॅली अशा विविध उपक्रमांद्वारे प्रत्येक विद्यार्थीनीने आपल्या घरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी आग्रह करण्याचा संकल्प बोलुन दाखवला.याप्रसंगी कन्या वस्तीगृहाच्या प्रमुख बोरस्ते मॅडम,सौ.शेलार व विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.