2025-03-25
कसबे सुकेणे ता ११- भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात नवरात्र उत्सवात दूर्गाष्टमी निमित्त सरस्वती पूजनासह बालिका पूजन करण्यात आले.इ.पाचवीच्या वर्गातील विद्यार्थीनींची सरस्वती रुपात पूजा करून त्यांना मिष्ठान्न भोजन देऊन नवरात्र उत्सवात विद्यार्थ्यीनींना एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात सहभागी होता यावे यासाठी मुख्याध्यापिका सौ.उज्वला तासकर यांच्या कल्पनेतून साकारलेला बालिका पूजन सोहळा संपन्न झाला यानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी गरबा दांडिया खेळत नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला.सर्व शिक्षिका या कार्यक्रमात सहभागी झाल्या.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
(फोटो- गीताई वाघ कन्या विद्यालय भाऊसाहेब नगर ता निफाड विद्यालयात बालिका दिनाप्रसंगी मुख्याध्यापिका उज्वला तासकर, शिक्षिका व बालिका)