जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत गीताई वाघ विद्यालयाचे यश-

2025-03-25


कसबे सुकेणे ता ८- जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत भाऊसाहेब नगर ता निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयाने क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील रस्सीखेच स्पर्धेत मुलींनी अंतिम सामना जिंकत विभागीय स्तरावर होणा-या स्पर्धेसाठी या मुलींची निवड झाली आहे. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या थ्रो बॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थीनींचे क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते चषक व पदक देऊन गौरविण्यात आले खेळाडूंच्या या यशाबद्दल क्रीडा शिक्षक समीर शेख यांचे कौतुक होत आहे.संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ,शकुंतला वाघ,अजिंक्य वाघ,के.एस.बंदी,यशवंत ढगे, प्राचार्य अशोक बस्ते, मुख्याध्यापिका उज्वला तासकर यांनी अभिनंदन केले आहे.
(फोटो- गीताई कन्या विद्यालयाच्या यशस्वी खेळाडूंसोबत मुख्याध्यापिका उज्वला तासकर व आदी)